Menu

स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती ,डोंबिवली

Swartirth Sudheer Phadke Smruti Samiti

header photo

रसिक जनहो

आमच्या संकेत स्थळावर  आपले सहर्ष स्वागत !

मराठी संगीत आणि बाबूजी यांचे नाते जसे अतूट तसेच

रसिक डोंबिवली शहर आणि फडके कुटुंबीय यांचे नातेही

अतूट !!

१९९५ साली बाबूजींच्या अमृत महोत्सवासाठी एक समिती

डोंबिवली शहरात स्थापन झाली होती.

 

त्यानिमित्ताने बाबूजींच्या ‘सावरकर’ या चित्रपटासाठी धन

संकलनाची सुरुवात  डोंबिवलीत झाली . डोंबिवलीकरानी भरघोस मदत केली हे वेगळे

सांगण्याची गरज नाहीच. ध .ना चौधरी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात साजऱ्या

झालेल्या अमृत महोत्सवाला अचानक आशाताई भोसले आल्या व कार्यक्रम फार

उंचीवर पोचला. कार्यक्रमानंतरही देणग्या येत राहिल्या व उर्वरीत  पुंजीतून २००२ साली

 

बाबूजींच्या दुःखद  निधनानंतर ‘ स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती, डोंबिवली’ची

२००३ साली  कुटुंबाच्या

सांगीतिक वाटचालीचा आढावा घेणारा सहा तासांचा भव्य दिव्य कार्यक्रम

 

सादर  करण्यात आला . पेंढरकर महाविद्यालयाच्या सहकार्याने विद्यापीठीय स्तरावरील

 

आंतर -महाविद्यालयीन संगीत स्पर्धा घेण्यात आली . सध्या डोंबिवली जिमखाना

 

व गुरुकुल द डे स्कूल यांचे बरोबर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संगीत

 

-नृत्य -नाट्य -अभिनय -वक्तृत्व स्पर्धा प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्यात घेण्यात येतात व

बक्षीस समारंभ १५ ऑगस्टला होतो . या द्वारे ६० शाळांमधील २००० विद्यार्थ्यांच्या

कला गुणाचे प्रकटीकरण होते 

 

२०११ पासून स्वरतीर्थ शिष्यवृत्ती देण्यात येते .शास्त्रीय गायन,तालवाद्य ,स्वर

वाद्य,उपशास्त्रीय गायन,लोक संगीत या पाच क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या 

एक हजार असे पाच वर्षे समिती तर्फेशिष्यवृत्तीद्वारे

देण्यात येतात.

 

२०११ साली वेगात पुढे येणारी गायिका कु. नुपूर काशीद ,२०१२ साली उत्कृष्ट तरुण

तबला वादक श्री.स्वप्नील भिसे यास ही  'स्वरतीर्थ ' शिष्यवृत्ती देण्यात आली तर

 २०१३ साली दोन विद्यार्थ्यांना कु. अमृता लोखंडे आणि श्री. अवधूत फडके यांना ही 

  'स्वरतीर्थ ' शिष्यवृत्ती देण्यात आली .

 

 २०११ हे वर्ष बाबूजींनी संगीत दिलेल्या ‘भाभीकी चुडिया ‘ या चित्रपटाला ५० वर्षे पुरी

झाल्याचे वर्ष . ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केले . या

चित्रपटातील 'ज्योती कलश छलके ' या गाण्याने अमाप लोकप्रियता मिळविली व

इतिहास घडवला . २०११ सालचा स्मृतिदिन 'ज्योती कलश छलके ' या नावाने विशेष

कार्यक्रम आयोजन करून समितीने २४ जुलै २०११ रोजी साजरा केला. श्री . राजदत्त व

श्री. प्रभाकर जोग हजर होते . जवळ जवळ १२०० श्रोते या कार्यक्रमाला हजर होते .

 

आपले राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यात ५ कडवी आहेत पण आपण फक्त एकच कडवे

म्हणतो .December २०११  मध्ये या गीताला १०० वर्षे पूर्ण झाली. समिती

महानगरपालिका आणि शहरातील अनेक संस्था एकत्र आल्या . एका अवर्णनीय

कार्यक्रमात हे ५ कडव्यांचे संपूर्ण ‘जन गण मन’ - ६० शाळांमधील ३८०० विद्यार्थ्यांनी

एक सूर एक तालात KDMC मैदानात गावून एक विक्रम प्रस्थापित केला.

Magsaysay अवार्ड विजेत्या नीलिमा मिश्र या कार्यक्रमाला उपस्थित होत्या

 

२०१२ साल अश्याच एका सुवर्णयोगाच ! बाबूजींचा गीतरामायाणाचा वसा समर्थपणे

पुढे चालविणारे पं . वसंतराव आजगावकर यांची पहिली ध्वनीमुद्रिका १९६२

सालची .  त्यातलं एक गीत 'करात  माझ्या वाजे कंकण ' होत ज्येष्ठ गीतकार  मधुकर

जोशी यांच . ते गायले होते माणिक वर्मा यांनी . माणिकताई आता नाहीत पण या

सुवर्णयोगातील इतर दोन कलावंत श्री आजगावकर व श्री मधुकर जोशी जे दोघेही

डोंबिवलीत स्थायिक आहेत. त्यांच्या उपस्थितीत २०१२ चा बाबूजींचा स्मृतिदिन

'करात  माझ्या वाजे कंकण ' या शीर्षकाच्या कार्यक्रमाने  साजरा झाला . दोघांचा

रुपये पंचवीस हजारांची थैली देवून सत्कार करण्यात आला. पं. आजगावकर आणि

त्यांचे सुपुत्र निनाद यांनी पूर्वार्धात सादरीकरण केले तर उत्तरार्धात श्री. विनायक जोशी

आणि इतर कलावंतांनी श्री मधुकर जोशी यांची गीते सादर केली .

 

डोम्बिवलीकराना  अभिमान वाटावा असा आणखी एक कार्यक्रम ‘गौरव तालवाद्यांचा

‘-समितीने ऑक्टोबर २०१२ मध्ये सादर केला . लोककलांच्या सादरीकरणामध्ये

वाजविली जाणारी अनेक वाद्ये आज अस्तंगत होण्याच्या वाटेवर आहेत . रसिकांना ही

वाद्ये माहीत व्हावीत या उद्देशाने लावणी सम्रादनी सुलोचना चव्हाण यांचे सुपुत्र विजय

चव्हाण यांनी हा कार्यक्रम सादर केला.

 

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने श्री. विवेक घळसासी यांची तीन

दिवसांची व्याख्यानमाला

२०१३ च्या जानेवारीत समितीने आयोजित केली.

२०१३ च्या स्मृतिदिनाच्या  कार्यक्रमाला जोडून समितीच्या   संकेत

स्थळाचे  /websiteचे उद्घाटन आ . रवींद्र चव्हाण यांचे शुभ हस्ते झाले . तसेच

'गीत रामायण -एक रसग्रहण' या श्री.किरण फाटक लिखित पुस्तकाचे प्रकाशन  डॉ .

अरुणा ढेरे यांचे शुभ हस्ते झाले.

 

डॉ . अरुणा ढेरे  व सौ सुधाताई म्हैसकर यांचे शुभ हस्ते २०१३ ची स्वरतीर्थ शिष्यवृती

या वर्षी दोघांना -अमृता लोखंडे आणि अवधूत फडके- प्रदान करण्यात आली . 

 

 'अनादी मी अवध्य मी '  हा बाबूजींचे आराध्य दैवत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर

यांचे जीवनावरील व साहित्यावरील कार्यक्रम सावरकर दर्शन प्रतिष्ठानने सादर  केला .

 

रसिकजनहो  कोणताही उपक्रम करावयाचा म्हणजे आर्थिक पाठबळाबरोबर

कार्यकर्त्यांची मजबूत फळी आवश्यक असते . आपण या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत

भाग घेवून हा  कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यास समितीची मदत करावी ही

कळकळीची विनंती . 

 

आमच्याशी संपर्क साधता यावा यासाठी आमचा पत्ता 'संपर्क' या पृष्ठावर दिला आहे

…. इतरत्र आमच्या कार्यकर्त्यांचे भ्रमणध्वनी दिले आहेत . 

 

आपल्या सक्रीय प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. 

 

 

स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती